सोलापूर जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल; वाढत्या उन्हामुळे ९ मार्चपासून शाळा ‘सकाळच्या सत्रात’

0

सोलापूर (प्रतिनिधी):राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, सोलापूर जिल्ह्यातही मार्चच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि वाढते तापमान लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले आहेत.

​यंदा उन्हाळ्याची चाहूल लवकरच लागली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी देखील पारा ३८ अंशावर स्थिरावला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, संपूर्ण मार्च महिना तापलेला राहणार असून तापमान ३३ ते ३९ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत वाढणाऱ्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे आणि घरी परतणे कठीण होत होते.

​सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ७७५ शाळा असून यामध्ये सुमारे १ लाख ९८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा पाहता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी ९ मार्चपासून वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here