महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन
राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय -राजा माने
पुणे, दि:१४: तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाअधिवेशन स्थगित केल्या नंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या २५ मे २०२५ (रविवार) रोजी आयोजित करण्याचा आज येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजा माने हे होते.राज्य सचिव महेश कुगावकर, सह सचिव केतन महामुनी,राज्य संघटक शामल खैरनार,राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे,अमोल पाटील हे उपस्थित होते. सतीश सावंत, विकास भोसले, इक्बाल शेख,तेजस राऊत,मुरलीधर चव्हाण तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश हुंबे, अजिंक्य स्वामी, संजय भैरे,प्रशांत कटारे, राजाराम मस्के आदी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले.
महामेळाव्यात महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण तसेच पत्रकारांच्या मुला-मुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला. पुणे येथील कार्यक्रम स्थळ व प्रमुख पाहुण्यांची नावे येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक