भाविक वारकरी मंडळाचे 9 मार्चला सांगोला येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन 

0

सांगोला (प्रतिनिधी): ” हेचि आम्हा करणे काम | बीज वाढवावे नाम || ” या संतउक्ती प्रमाणे वारकरी संप्रदायातील संत विचाराचे मंथन व्हावे , वारकरी संघटन व्हावे, समाज मनाला स्थिरता मिळावी या हेतूने भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून श्री संत नामदेव महाराज 16 वे वंशज ह भ प माधव महाराज नामदास (पंढरपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन, अंबिका मंदिर चौक, तहसील कार्यालय, सांगोला जि. सोलापूर येथे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

दि.09-03-2025 (रविवार) रोजी स. 9.30 वा. ग्रंथ दिंडी – अंबिका मंदिर ते हॉल – स. 10.00 वा. कार्यक्रम उदघाटन होणार असून ह भ प निरंजननाथ योगीजी महाराज ( संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी – प्रमुख विश्वास्थ ) हे प्रथम सत्राचे अध्यक्ष असतील व प्रमुख अतिथी ह भ प श्रीगुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज ( वासाकर फड – पंढरपूर ) असतील तसेच प्रमुख उपस्थिती ह भ प भागवत चवरे महाराज ( राष्ट्रीय उपाध्यक्ष )ह भ प अक्षय भोसले महाराज (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी शिवसेना ) आचार्य तुषार भोसले (प्रदेश अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी भा ज पा ) बाबासाहेब देशमुख आमदार, .समाधान दादा अवताडे आमदार, दिपक (आबा) साळुंखे माजी आमदार, शहाजी (बापू ) पाटील माजी आमदार, चेतनसिंह केदार सावंत ( जिल्हाध्यक्ष भा ज पा ) , राजा माने (संस्थापक अध्यक्ष- डिझिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ), संतोष कणसे तहसीलदार सांगोला, डॉ .सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला नगरपरिषद सांगोला, भीमराव खणदाळे (पोलीस निरीक्षक, सांगोला ) हे असतील.

तसेच दु. 2.00 वा. वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट, दु. 2.30 वा.महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी मनोगत होऊन 4.00 वा समारोप व पसायदानाने सांगता करण्यात येणार आहे. तरी सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सतीश भाऊ सावंत ( मा. सभापती सांगोला नगरपरिषद सांगोला )जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ) यांनी पत्रकार परिषद मध्ये केले. तसेच ज्ञानेश्वर माऊली भगरे ( जिल्हा अध्यक्ष ), बिरा बंडगर महाराज (सह जिल्हा अध्यक्ष ) अखिल भाविक वारकरी मंडळ सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत. या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), ज्ञानेश्वर माऊली भगरे (जिल्हाध्यक्ष – पंढरपूर विभाग ), महादेव दिवसे हे उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here