सांगोला शहर व तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद

0

स्व. संतोष देशमुख व स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्याप्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यााठी रविवार दि. ९ मार्च रोजी सकल मराठा समाज बांधवांकडून सांगोला बदंची हाक देण्यात आली होती. त्यामुळे रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कृषि उत्पन्न बाजार समितीमधील जनावरांच्या बाजारासह मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यामुळे दिवसभर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आला. शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

 

अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच हॉटेल, किराणा दुकाने, कापड दुकाने, जनरल स्टोअर्स सह सर्वच व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून उस्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी झाले. सकाळी १०.३० चे सुमारास महात्मा फुले चौकातून मुक मोर्चा काढत संतोष देशमुख यांच्या निघृणपणे केलेल्या हत्येचा निषेध केला. मूक मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांचे फलक तसेच काळे झेंडे हाती घेवून मोर्चात नागरिक सामिल झाले होते. सकल मराठा समाज बांधवांकडून व्यापारी, किरकोळ व्यावसायिक यांना आपापली व्यापार दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी या बंदला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

यावेळी युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील, शिवाजी बनकर, सौ. स्वाती मगर, बापूसाहेब ठोकळे, अॅड. महादेव कांबळे, अरविंद केदार, सुरेश माळी, डॉ. विजय बंडगर, इरशाद बागवान यांच्यासह अनेकांनी मनोगते व्यक्त करुन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. मोर्चामध्ये मराठा समाज बांधवांसह बहुजन समाजाबांधव, व्यापारी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

तहसीलदार सांगोला यांना निवेदन देवून मूक मोर्चाची सांगता करण्यात आली. कै. संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशीचे शिक्षा व्हावी, कै. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, मसाजोग येथील खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी, महिलावर वारंवार होणाऱ्या अत्याचाराला न्याय देण्यासाठी तात्काळ वेगळी व्यवस्था करून त्वरीत कारवाई व्हावी, वारंवार महापुरुषांचे अवमान करून समाजात तेड निर्माण करणाऱ्या समाज कंठकावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा, सांगोला पोलिसांनी एसटी स्टॅण्ड, शाळा, कॉलेज व रेल्वे स्टेशन आणि सर्व धार्मिक स्थळावर योग्य ती गस्त ठेवून चुकीचे काही आढळल्यास त्वरित कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here