सांगोला (प्रतिनिधी): सावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी कु. अंकिता हरिदास स्वामी इयत्ता सातवी हि सोलापूर प्रज्ञाशोध परीक्षे मध्ये २०० पैकी १२० गुण मिळवून तालुका गुणवत्ता यादीत दुसरी आली. या उज्वल यशाबद्दल तिचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता औदुंबर खंकाळ व तिचे वडील श्री. हरिदास स्वामी यांचा वर्गशिक्षक व मार्गदर्शक शिक्षक श्री. रवि जवंजाळ सर यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार तिच्या घरी जाऊन करण्यात आला.
सत्काराच्या वेळी शाळेतील सर्वश्री चंद्रकांत भोजने सर, तानाजी घाडगे सर, अनुरथ कोळेकर सर, दुर्योधन इमडे गुरूजी, वसंत इमडे गुरूजी, श्री. औदुंबर खंकाळ व अंकिता स्वामी हिचे आई, आजी व बहीण उपस्थित होते. तसेच शाळेतील संजय काळे सर, राजेंद्र जाधव सर व श्रीम. वनिता शिंदे मॅडम यांनी या उज्वल यशाबद्दल अंकिता स्वामी हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत या सावे शाळेचे इ. २री तील कु. आर्यन अविनाश बाबर याने १२६ गुण मिळवून जिल्ह्यात ८ वा तर तेजश्री निलेश माने हिने १२० गुण मिळवून जिल्ह्यात ११ वी गुणवत्ता यादीत आलेत. या दैदीप्यमान यशाबद्दल यां मुलांचा व मार्गदर्शक शिक्षक तानाजी घाडगे सर यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला.
सदर गुणवंत विद्यार्थ्यांचे शा.व्य. समिती अध्यक्ष श्री. शंभू माने, उपाध्यक्ष सौ. वैशाली सुरेश देवकते व सर्व सदस्य तसेच सरपंच श्री. शिवाजी वाघमोडे व ग्रा.पं. सदस्य, श्री. संतोष देवकते माजी उपसभापती पं.स आणि सावे गावातील सर्व प्रतिष्ठित लोकांनी या यशस्वी सर्व मुलांचे कौतूक व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक