प्रतिनिधी (शशिकांत कोळी): अधिसंख्य पदावरील बांधवांना स्थायित्वाचा व फंडाचा लाभ द्यावा यासाठी सांगोला तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा कोळा शाळेतील शिक्षक सुनिल ननवरे सर यांनी सोलापूर जिल्हा परिषद समोर पूनम गेटवर प्राणांकित उपोषण सुरु केले होते.सदरच्या उपोषणस्थळी शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुनिल कोरे सर मा.चेअरमन आवेश करकमकर सर गुंडिबा कांबळे सर नेते अमोघसिद्ध कोळी सर यांनी तसेच शिवसेना ( उ.बा.ठा.) चे उपनेते शरद कोळी समाजाचे नेते दत्तात्रय सुरवसे रेणुकाचार्य खानापुरे भारत करकमकर संजय माने सोमनाथ अभंगराव सिद्धाण्णा कोळी व अधिसंख्य पदावरिल बहुसंख्य बांधव यांनी भेट दिली.
यावेळी सर्व शिष्टमंडळानी सी.ई.ओ. श्री स्वामी साहेब शिक्षणाधिकारी श्री कादर शेख साहेब यांची भेट घेवून याबाबत सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले.यावेळी सी.ई.ओ स्वामी साहेब व शिक्षणाधिकारी शेख साहेब यांनी त्वरित उपोषण सोडवावे आपल्याला योग्य तो न्याय दिला जाईल फंडाची खाती त्वरित काढली जातील व स्थायित्वाचा लाभ ही नियमानुसार दिला जाईल असा शब्द देवून लेखी ही दिले.त्यामुळे os श्री चंद्रकांत होळकर साहेबांनी उपोषककर्ते सुनिल ननवरे सरांना पत्र देत अमोघसिद्ध कोळी सर यांचे शुभहस्ते पाणी देवून उपोषण सोडविले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक