सांगोला तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बेहरे चिंचोली या ठिकाणी आयोजित केल्या होत्या . स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे शाळेच्या लहान गट खो-खो मुली यांनी अंतिम विजय मिळवला.
सदर अंतिम सामना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदहिवडी विरुद्ध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे यांच्यात झाला .अतिशय चुरशीच्या या सामन्यात सावे शाळेने विजय मिळवला. तसेच २०० मी धावणे स्पर्धेत दुर्गा नलवडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला . मुख्याध्यापिका खंकाळ मॅडम , कोळेकर सर , काळे सर , जाधव सर , भोजणे सर , शिंदे मॅडम व क्रीडा शिक्षक घाडगे सर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले .
क्रीडा स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभासाठी आदरणीय गटविकास अधिकारी कुलकर्णी साहेब, गटशिक्षणाधिकारी नवले साहेब , विस्तार अधिकारी कुमठेकर साहेब व भंडारे साहेब तसेच केंद्रप्रमुख मठपती साहेब बेहरे चिंचोली विद्यालयाचे मुख्याध्यापक , सर्व क्रीडाशिक्षक व खेळाडू उपस्थित होते गटविकास अधिकारी कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले . सावे शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंभू माने उपाध्यक्ष वैशाली देवकते व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक