वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; मुंबई ओपन राष्ट्रीय स्पर्धेत 18 मुलांनी मारली बाजी

0

19 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंधेरी येथे जेनशिन रियु कराटे डो फेडरेशन यांच्यामार्फत मुंबई ओपन राष्ट्रीय स्पर्धेत सांगोल्याच्या 18 मुलांनी यश संपादन केले.

यामध्ये योगिनी रणदिवे, गौरंगी मोरे, गुरुराज पांढरे, सिद्धार्थ माने यांनी सुवर्णपदक, मिष्का धांडोरे, आरोही सावंत, श्वेताली सावंत, राजवर्धन पाटील, तेजस कांबळे रोहितला अरबळी यांनी रौप्यपदक तर निधी पिसे, साक्षी रणदिवे, अनुष्का मोहिते, सारा मोरे, नव्या मागाडे,  असद खतीब,यश कोकरे,  अथर्व बंडगर यांनी रौप्यपदक मिळविले.

यशस्वी स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री सुनील वाघमारे सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू थायलंड (बँकॉक)निजेंद्र चौधरी, श्रावणी वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंना मा.चेतनसिंह केदार,  भाई राजू मगर, स्वातीताई मगर, डॉक्टर शैलेश डोंबे,  साहिल सय्यद, संदीप चौगुले, श्रीनाथ बिडिकर,  उत्तम ढोले, मयूर ढोले,  प्रताप (आबा) इंगोले, रतनतलाल चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक जि.के वाघमारे सरांनी शुभेच्छा दिल्या.

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here