सांगोला (प्रतिनिधी): टेंभू सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन सोडण्याकरता आज मुंबई येथील मंत्रालयात जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेतली. यावेळी मंत्री महोदयांशी बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून त्यामुळे तालुक्यातील गावांना शेती पिकासाठी सिंचन उपलब्ध करून नियोजनबद्ध पद्धतीने आवर्तन लवकरात लवकर सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी आज आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली.
त्यावर जलसंपदा मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना शनिवार दि. १० मे पासून शेतकऱ्यांसाठी पीक सिंचन आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले. मंत्री महोदयांनी तत्काळ सकारात्मकता दर्शवत पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक