रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्रोफेसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांनी लिहिलेल्या “ग्रामीण भारताचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील”या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अकलूज येथील ‘शिवरत्न’ बंगला या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पडला.

या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह दादा मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी आमदार मा.रणजितसिंह मोहिते पाटील, खा.मा. धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. मदन सिंह मोहिते पाटील, अकलूजचे उपनगराध्यक्ष मा. शिवबाबा मोहिते पाटील, नूतन नगरसेवक मा. सयाजी राजे मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील परिवार व महाराष्ट्रातून आलेले अनेक हितचिंतक उपस्थित होते.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


