चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला शब्द पाळला; पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी सहाय्यास प्रारंभ
संस्थापक राजा माने यांची माहिती
“महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसेच मुला-मुलीच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करु! “,असा शब्द राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिला होता.त्या शब्दास अनुसरुन प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिले आणि आता राज्यातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असलेल्या राजा माने यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. राज्यातील गरजू पत्रकारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,राज्य संघटक तेजस राऊत, राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण, मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत देशमुख ,पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के ,सोलापूर शहराचे अध्यक्ष परशुराम कोकणे आदी उपस्थित होते.खालील लिंकवर ऑनलाईन अर्ज करून एका कागदावरील अर्ज व्हॉट्सअँप द्वारे 8668343024 या नंबरवर पाठवावा.
https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9
*शैक्षणिक मदत आर्थिक सहाय्यासाठी अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक मदतीसाठी)*
@@@@@@@@@@@@@
*खेळ / क्रीडा सहाय्यासाठी अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या मुला-मुलींच्या खेळ / क्रीडा सहाय्यासाठी )*
https://forms.gle/URAaTFEWhFe7rzVQ9
वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा अर्ज – प्रतिबिंब प्रतिष्ठान (डिजिटल मीडिया पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारासाठी )
https://forms.gle/rDK8kiLWGZhQfQ5Y6सोबतची प्रतिबिंब प्रतिष्ठान ची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक / साप्ताहिक मध्ये प्रसिद्ध करावी तसेच youtube व पोर्टलला लावावी ही नम्र विनंती
आपला
राजा माने संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संस्था संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र गोवा कर्नाटक
संस्थापक अध्यक्ष प्रतिबिंब प्रतिष्ठान महाराष्ट्र
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक