हतीद (प्रतिनिधी): माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, हतीद शाखेमार्फत संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास हतीद ग्रामस्थांचा उत्स्फूर्त व भरभरून प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात गावातील सुमारे 100 हून अधिक महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

या प्रसंगी संस्थेच्या चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले मॅडम यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत संस्थेच्या सामाजिक व आर्थिक उपक्रमांची माहिती दिली. हतीद शाखेस ग्रामस्थांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल व कार्यक्रमास मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमास सरपंच सौ. संगीता घाडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य निवेदिता घाडगे, ग्रामपंचायत सदस्य रूपाली घाडगे पाटील, माजी सरपंच सुवर्णा भंडगे यांच्यासह तेजश्री घाडगे, अरुणा सावंत, अलका होवाळ, सविता घाडगे, संगीता घाडगे, मीनाक्षी घाडगे, करिष्मा तांबोळी, लक्ष्मी खंडागळे, संगीता सुतार, लक्ष्मी होवाळ, लक्ष्मी सुतार, प्रियांका घाडगे, शारदा पवार, नीलम घाडगे, वैशाली देशमुखे, वृषाली देशमुखे, श्वेता जैन, वैजंता पाटील, कविता माळी आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

तसेच माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे सर्व कर्मचारी वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


