सांगोला (अमर कुलकर्णी ):माढा तालुक्यातील श्री संत सावता माळी यांची पुण्यनगरी अरण येथील यशोदा गुरुकुल सभागृहात सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे संस्थापक अध्यक्ष,व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनात गेली 18 वर्षे नियमित निघणारी ग्रंथालय दिनदर्शिका 2026 प्रकाशन सोहळा मा.आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ डाॕ.गजानन कोटेवार यांनी भूषवले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे ,ग्रंथालय निरिक्षक संजय ढेरे ,तांञिक सहाय्यक प्रमोद पाटील ग्रंथमिञ कुंडलिक मोरे यांची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्योपध्यक्ष ग्रंथमिञ राम मेखले प्रमुखकार्यवाह ग्रंथमिञ सोपानराव पवार ,कोषाध्यक्ष भिमराव पाटील , जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमिञ विजयकुमार पवार उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे प्रमुखकार्यवाह साहेबराव शिंदे ,जिल्हा व तालुका ग्रंथालय संघाचे संचालक मंडळ पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन ग्रंथालय संघ कार्यास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथमिञ हरिदास रणदिवे सूञसंचालन सौ.सुप्रिया किरनाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांगोला तालुका ग्रंथालय संघ अध्यक्ष हरिदास घोडके उपाध्यक्ष संजय सरगर सचिव अशोक व्हटे सहसचिव रणजित भगत कोषाध्यक्ष बिरुदेव काळे ,प्रसिध्दीप्रमुख औंदुबर काळे ,संचालक दत्ताञय पाटील ,राजाभाऊ इंगोले ,लक्ष्मण दिघे ,शरद कोळवले यांनी परिश्रम घेतले यावेळी विजय वलेकर, समाधान मदने, आदिनाथ घोडके ,माजी अध्यक्ष अशोक गंगाधरे ,अशोक सावंत सौ.रंजना सरगर उपस्थित होते . या कार्यक्रमास सांगोला तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी पदाधिकारी अधिवेशनास जिल्ह्यातील उपस्थित ग्रंथालय पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



