क्रीडा व युवकसेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी पंचायत समिती सांगोला यांच्या विद्यमाने आयोजित सांगोला तालुका शालेय कराटे स्पर्धा दिनांक 26 ऑक्टोंबर 2024 रोजी क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन सूर्योदय उद्योग समूहाचे चेअरमन बंडोपंत लवटे व सुभाष दिघे सर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सदर स्पर्धा 14, 17 19 या वयोगटाप्रमाणे घेण्यात आल्या. स्पर्धेला सांगोल्यातील विविध शाळेचा सहभाग होता. अ श्रेणी मान्यताप्राप्त पंच जी. के. वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यताप्राप्त पंच निजेंद्र चौधरी (अ श्रेणी) पंच, श्रावणी वाघमारे( अ श्रेणी ), पंच मयंक स्वामी, आशिष कोकरे अभिजीत बनसोडे यांनी पंच म्हणून काम पाहिले तर सुभाष निंबाळकर, अमोल इमडे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच शहाजी घाडगे सर, ज्येष्ठ पंच सुनील वाघमारे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक