शशिकांत कोळी: अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद [प्राथमिक विभाग] च्या प्रांत कार्यकारणी ची बैठक नुकतीच ठाणे येथे संपन्न झाली.प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे प्रभारी राष्ट्रीय उपाध्यक्ष भिखाभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांची सोडवणूक करण्यासाठी पुढील कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली.
याच बैठकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवस्ती( महिम ) तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे कार्यरत असलेले किरण कुंभार यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली . त्याबद्दल सोलापूर जिल्हा मा आ .दीपक आबा साळुंखे पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान करताना वरील विचार व्यक्त केले .
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ हे देश पातळीवर शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी मोठी संघटना असून सुमारे 26 राज्यात त्यांचे कार्य सुरू आहे . महाराष्ट्रात त्यांचे कार्य आता परिषदेच्या माध्यमातून जोरात सुरू झाले आहे आणि यामध्ये अत्यंत प्रामाणिक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून श्री किरण कुंभार यांच्या रूपाने सांगोला तालुक्याला राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली हे तालुक्यासाठी भूषणावह आहे .
या शिक्षक परिषदेच्या पवित्र कार्यास साळुंखे पाटील परिवार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिल असे प्रतिपादन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
या प्रसंगी सांगोला तालुका नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष अरविंद केदार, उद्योगपती जगन्नाथ भगत गुरुजी, सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटी चे संचालक गुलाबराव पाटील,शिक्षक नेते विकास साळुंखे,संजय गायकवाड, राजेंद्र पाटील, कैलास मडके, विलास डोंगरे, संतोष निंबाळकर,नागेश हवेली, नामदेव इंगवले, अंकुश घाडगे, नागनाथ राजमाने, अजय बाबर, मंगेश धोत्रे, सुरेश साळुंखे, संतोष चौगुले, अशोक शिंदे,निहाल तांबोळी,अंकुश वाघमोडे इत्यादी मित्र परिवार उपस्थित होता .
उपस्थित सर्वांचे स्वागत कैलास मडके यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ भगत यांनी केले . तर सर्व बैठकी चा आढावा घेवून राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक