कै.संभाजीराव शेंडे ग्रामीण पतसंस्थेचे कार्य सहकार क्षेत्रात प्रेरणादायी – डॉ.बसवेश्वर चेणगे

0

सांगोला (प्रतिनिधी): मेडशिंगी येथील कै. संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे ग्रामीण बिगर शेती पतसंस्था या पतसंस्थेला कराड अर्बन बँक सांगोला शाखेचे व्यवस्थापक जेष्ठ साहित्यिक सहकार विभागाचे गाढे अभ्यासक डाॕ. बसवेश्वर चेणगे यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त करीत होते .

ते पुढे म्हणाले ग्रामीण भागातील गरजू होतकरू लोकांना कर्ज पुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनवणे व त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे ध्येय संस्थेत ठेवले असून ते समाजाला प्रेरणादायी आहे संस्थेने इमारत तत्पर सेवा देणारे कर्मचारी अनुभवी संचालक मंडळ यामुळे निश्चित या संस्थेचे भवितव्य उज्ज्वल आहे त्यांच्या भावी वाटचालीस त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन शंकर लवटे संचालक प्रवीण इंगोले यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला संस्थेचे सचिव विशाल शिंदे यांनी संस्थेच्या सर्व कामकाजाची माहिती दिली या कार्यक्रमास मा.सरपंच सुरेश (भाऊ) इंगवले ,ग्रंथपाल अमर कुलकर्णी,ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष संजय सरगर ,पञकार संपादक सुरेश गंभीरे मेंडशिंगीचे युवानेते योगेश झाडबुके इत्यादी मान्यवर तसेच संस्थेचे हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here