प्रतिनिधी (शशिकांत कोळी):सोलापूर जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र सर्व प्रलंबित अर्जाचा समर्पक विचार करून सुलभ पद्धतीने जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी दि ६|५|२०२५ रोजी पासून महादेव कोळी क्रांती सेनेच्या वतीने आमरण अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
बार्शी, मंगळवेढा, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोळी महादेव अनुसूचित जमातीचे जमातीच्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 16 प्रलंबित अर्ज असून उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक या कार्यालयाकडून मंडळ अधिकारी रिपोर्ट अपूर्ण आहे असे सांगून 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. सक्षम अधिकाऱ्यांकडून हेडसाळ होत आहे तरी बार्शी, मंगळवेढा, उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून जातीचे प्रमाणपत्र द्यावे.
बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यातील व मंगळवेढा तालुक्यातील कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या अर्जदारांना जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी महादेव कोळी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा साळुंखे, तात्यासाहेब भंडारे, सुरज खडाखडे, एमटी कोळी, अभिमान घंटे, शंकर कोळी, शिवानंद हचनाळे, अरविंद नाईकवाडी आणि कोळी बांधव उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक