सांगोला (प्रतिनिधी)- ब्राह्मण सभा, सांगोला व परशुराम युवक संघटना, सांगोला यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी श्री दत्त मंदिर, महादेव गल्ली, सांगोला येथे संध्या. ठीक ५.३० वाजता भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवर व सर्व समाज बांधवांच्या हस्ते करण्यात येणार असून यानंतर ‘ भगवान परशुराम अवतार व कार्य’ या विषयावर बाल व तरुणांच्या वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकास प्रोत्साहनपर भेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व समाज बांधवांनी ब्राह्मण्यत्वाचा अभिमान ठेवून कार्यक्रमात सह कुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क – मानस कमलापूरकर ९४२३३३५९८८ वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपर्क- तेजस कुलकर्णी ९६६५६३६९१४
महाप्रसाद देणगी निलेश ताकभाते ९८२२३६७४८६
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक