सांगोला (प्रतिनिधी)- सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, सांगोला या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने १० ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल सांगोला या कॅम्पस मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० ऑगस्ट ह्या दिवशी स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांची जयंती सांगोला शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून इंग्लिश स्कूल सांगोला या कॅम्पस मध्ये श्रमिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १० ऑगस्ट रोजी स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वा. भव्य रक्तदान शिबीर व विविध गटातील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी विविध गटातील तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०० वाजता खुल्या गटातील राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी १०:०० वा. मुख्य कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुख्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक व विचारवंत मा.प्रा.व. बा. बोधे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर व सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
या भव्य दिव्य कार्यक्रमाचा लाभ सांगोला शहर व तालुक्यातील सर्व विद्यार्थी व आबासाहेब प्रेमी लोकांनी घ्यावा असे आवाहन डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेजचे प्राचार्य मा.श्री. केशव माने सर व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर तसेच कार्यक्रमाचे संयोजक प्रा. अशोक कांबळे यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक