श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागात ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

0

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागाच्या वतीने 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंह यांच्या वीर पुत्रांनी धर्मपरिवर्तनास नकार देत हौतात्म्य पत्करले, त्या ऐतिहासिक त्यागाच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.

या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात हा उपक्रम अनोख्या व प्रेरणादायी पद्धतीने राबविण्यात आला. वीर बाल दिवसानिमित्त आयोजित व्याख्यानासाठी ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीतील वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी कु आरती जालिंदर पाटील हिला व्याख्याती म्हणून संधी देण्यात आली. तिने इतिहासातील विविध दाखले देत, शौर्य, त्याग व धर्मनिष्ठेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. तिच्या अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणीने उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते. त्यांनी वीर बाल दिनाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी मूल्याधिष्ठित जीवन जगावे, असे आवाहन केले. यावेळी प्रा. विष्णुपंत जाधव व वरिष्ठ लिपिक पांडुरंग नाईक नवरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनियर विभाग प्रमुख संताजी लोखंडे यांनी केले, तर कार्यक्रमाचा समारोप तेजश्री सावंत यांच्या सुमधुर पसायदानाने करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहशिक्षक श्री. संजय बाबर, श्री. दत्तात्रय टकले, श्री. हनुमंत माने, सौ. स्वाती बाबर, सौ. वनिता सावंत, श्री. जालिंदर पाटील यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वीर बाल दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, त्याग आणि धैर्य यांसारख्या मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here