सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणीचे पत्र जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिले आहे.
सांगोला तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ गावे यात येत असून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीवर १९ बंधार्यावर अवलंबून असणाऱ्या १९०० ते २००० हेक्टर जमिनीसाठी पाणीसाठा कमी क्षमतेने असल्याने सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी तात्काळ सोडल्याने माण व कोरडा नदीवर अवलंबून असणारे १९ बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न याद्वारे तात्काळ मार्गी लागेल.
यासाठी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्यात येवून सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावेत अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेली असून मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक दर्शविल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक