घेरडी ग्रामपंचायत तर्फे महिलांचा अभ्यास दौरा उत्साहात संपन्न 

0

कोल्हापुरातील ऐतिहासिक कणेरी मठासह कृषी प्रदर्शनाला तब्बल 225 महिलांची भेट

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): घेरडी ग्रामपंचायत सातत्याने काहीतरी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्याच एक भाग म्हणून घेरडी ग्रामपंचायत मार्फत तब्बल 225 महिलांना मोफत अभ्यास दौरा सरपंच सौ धुरपाबाई सुरेश देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली घेरडी ग्रामपंचायतने घडवून आणला.

सकाळी आठ वाजता घेरडी येथून मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ट्रॅव्हलचे पूजन करून दौरा मार्गस्थ झाला यामध्ये प्रथम नरसोबावाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिराला भेट देऊन कोल्हापुरातील कनेरी मठाला भेट दिली

कणेरी मठातील वसवलेले गाव पुतळे हुबेहूब मुर्त्या पानाफुलांची बाग गुहा जनावरांचे हुबेहूब पुतळे हत्तींची हुबेहूब मूर्ती यासह अनेक वन्य प्राण्यांच्या हुबेहूब मुर्त्या शिल्पकला प्राचीन साधू महंतांची गुहा त्यामध्ये बसलेले साधू यांश विविध कोरीव काम पाहून महिलांना जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्यानंतर कोल्हापूर येथील कृषी प्रदर्शन आज भेट देण्यात आली कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक शेती विषयक तंत्रज्ञान व माहिती सर्वांना प्रेरणा देणारी होती सदर दौरा घेरडी ग्रामपंचायत तर्फे मोफत असल्याने महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सदर दौरा यशस्वी करण्यासाठी यशस्वी उद्योजक पिंटू दादा पूकळे,रा.स.प. राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सोमा (आबा) मोटे, विनायक कुलकर्णी सर प्राध्यापक किसन माने सर मा. सरपंच बयाजी लवटे उपसरपंच नितीन खुळपे ग्रामपंचायत सदस्य सयप्पा करे सुरेश देवकते इत्यादींचे सहकार्य लाभले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here