गौडवाडी येथे कार्यकर्ता क्षमता बांधणी कार्यशाळा उत्साहात संपन्न

0

गौडवाडी (शशी हातेकर): आज दि. ०२ नोव्हेंबर रोजी गौडवाडी ता. सांगोला येथे डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था अंतर्गत होलार समाज विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने कार्यकर्ता क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे अध्यक्ष गौडवाडी गावचे सुपुत्र मा. श्री.सुखदेव गुळीग (तात्या), या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा.आबा शेजाळ साहेब ,या कार्यशाळेचे प्रोसिडिंग प्रतीक जावीर सर ,सामाजिक कार्यकर्त्या अनिशा जावीर मॅडम आणि तिन्ही समाजातील युवक युवती महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यशाळेला उपस्थित असणारे अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे यांचा मानाचा फेटा व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.

या कार्यशाळेची प्रस्तावना सौ. अनिशा जावीर मॅडम यांनी केली. प्रस्तावनेमध्ये त्यांनी संस्थेविषयी माहिती दिली, त्यामध्ये संस्था किती वर्षापासून कार्यरत आहे . संस्था वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करते याची सुद्धा माहिती त्यांनी दिली. हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश काय आहे हे त्यांनी अवगत करून दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेव गुळीग (तात्या )यांनी होलार समाज विकास प्रतिष्ठान या संस्थेविषयी माहिती दिली सेवानिवृत्त झालेल्या लोकांनी मिळून या संस्थेची बांधणी केली व त्यांनी समाज कार्यामध्ये वाहून घेतले आहे. ही संस्था गेल्या पंधरा वर्षापासून स्वतःच्या खिशातून खर्च करून होतकरू मुलांना आर्थिक मदत करते.ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आटपाडी वस्तीगृहामध्ये स्वतः होलार समाज विकास प्रतिष्ठानच्या जबाबदारीवर मुलांना आई-वडिलांपासून लांब ठेवून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे यावर त्यांनी बरीच उदाहरणे देऊन माहिती दिली.

प्रमुख पाहुने व मार्गदर्शक मा. श्री. आबा शेजाळ साहेबांनी व्यसनावर वेगवेगळ्या कविता घेऊन महिलांचे युवकांचे प्रबोधन केले ,आजची पिढी कशी व्यसनाधीन झाली कोण कोणती व्यसन करतात, कशा प्रकारे करतात, त्याचे दुष्परिणाम काय यावर त्यांनी मार्गदर्शन केले दारूही तुपापेक्षा महाग कशी आहे हे त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट करून दाखवले. तसेच त्यांनी “आजचा महाराष्ट्र” यावर विशेष असे चर्चा केली. या कार्यशाळेमध्ये महिला या आजच्या सावित्रीच्या लेकी आहेत, हे त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले. शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच आर्थिक पाठबळ देणे यावर त्यांनी चर्चा केली महिलांना उद्योग करण्यासाठी वेगवेगळे उद्योग आहेत त्याची लिस्ट वाचून दाखवली आणि ज्यांना उद्योग करायचा आहे अशा महिला सोबत आम्ही काम करू असे या कार्यशाळेच्या माध्यमातून युवकांना व महिलांना माहिती दिली.

कार्यशाळेचे आभार प्रदर्शन मा. श्री. दत्ताराजे गुळीग यांनी केले आभार प्रदर्शनामध्ये त्यांनी समाजातील युवकांना छोटे-मोठे उद्योग द्यावेत, तसेच महिलांना गटावर उद्योग न देता वैयक्तिक महिलांना आर्थिक मदत करून त्यांचा उद्योग वाढवून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे तसेच डिप्लोमा डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉब साठी त्यांना मदत करावी.

या कार्यशाळासाठी मैत्री उद्योग समूहाचे मालक पत्रकार शशि हातेकर शिवाजी गुळीग सर,उज्वल गुळीग मेजर, दत्ताराजे गुळीग,जितेंद्र गुळीग, विशाल गुळीग , संजय वाघमारे,आबासाहेब गुळीग, अर्जुन गुळीग, सौरभ गुळीग,अशोक कांबळे, अमोल गुळीग, दशरथ गुळीग यांनी परिश्रम घेऊन ही कार्यशाळा पार पडली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here