रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे शनिवार, दि. ३० ऑगस्ट, २०२५ रोजी “भारतीय ज्ञानपरंपरा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा इतिहास व राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने पीएम उषा योजने अंतर्गत घेण्यात येणार आहे.

या कार्यशाळेसाठी श्री. शितल गांधी, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, डॉ. सतीश कदम, डॉ. गोपाळ जोगे, डॉ. सचिन जोशी, डॉ. समाधान पवार, डॉ. आर. एन. जाधव, डॉ. धनराज हाके व डॉ बाळासाहेब चव्हाण हे साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये माढा परिसराचा मध्ययुगीन इतिहास प्राचीन कला आणि वास्तुशास्त्र प्राचीन भारतीय पुरातत्त्व पारंपरिक तंत्रज्ञान अशा विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यशाळेचे आयोजक प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, संयोजक डॉ. रवीराज कांबळे असून समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल व डॉ. सतीश घाडगे, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी हे आहेत. सदर कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



