सोनंद(प्रतिनिधी)- 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगामुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतात.
विद्यार्थ्यांना लहानपणापासून योग, प्राणायम याची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलात सर्व विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस व सहज समाधी योग याचे प्रशिक्षण पूर्ण करून योग शिक्षक म्हणून काम करणारे गुरु श्री. अविनाश कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शनाखाली विविध योगासने व प्राणायम, सूर्यनमस्कार इ. प्रकार अगदी सहज व सोप्या पद्धतीने घेतल्याने बालगोपाळांनी श्री. कुलकर्णी सरांना खूप धन्यवाद दिले.
विद्यार्थी वर्गाला आज नवीन काहीतरी शिकायला मिळाल्याने उत्साही दिसत होती. श्वसनाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने घेतल्याने, त्यांनी तात्काळ आत्मसात केले.
सुरुवातीला ज्यूनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुभाष आसबे यांनी योग शिक्षक कुलकर्णी सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सरांचा परिचय श्री. अमोल केंगार यांनी करून दिला.
यावेळी संस्था सदस्या सौ. राजनीताई भोसले, प्राचार्य,मुख्याध्यापिका,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, सेवक, सेविका या सर्वांनीच या योगशिबिरात सहभाग नोंदविला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक