वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात योग दिन साजरा

0

शरीर संपत्ती, शरीराचे रक्षण करण्यासाठी नियमित योगा करा:– सुवर्णा इंगवले

सांगोला ( प्रतिनिधी):आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात योग प्रात्यक्षिके सुवर्णा इंगवले मॅडम यांनी सादर केली. प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


प्रशालेच्या मैदानावर योगाचे धडे योग गुरु तथा योग अभ्यासक सुवर्णाताई इंगवले मॅडम यांच्यावतीने देण्यात आले. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगा आवश्यक असल्याचा मंत्र यावेळी त्यांनी दिला. योग दिनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी भुजंगासन, वज्रासन, पद्मासन , ताडासन,शीर्षासन, शवासन, योग मुद्रा इत्यादी आसणे प्रत्यक्ष करून दाखवली त्याप्रमाणे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी योगासने केली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शरीर संपत्ती, शरीराचे रक्षण करिता नियमित योगासन करण्याकरिता मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार यांनी केले यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here