सांगोला (प्रतिनिधी): युवा मंत्रालय भारत सरकार आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद आयकॉन युथ २०२५ मंगलोर येथे पार पडली. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सांगोलातील वाकी शिवणे गावचा सुपुत्र योगेश बापू कर्चे याने शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे व राज्याचे प्रतिनिधित्व करणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून तसेच विदेशातून रशिया, आफ्रिका,श्रीलंका इत्यादी विविध देशातून प्रतिनिधी उपस्थित राहिले होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी योगेश बापू कर्चे याने’ कृषी प्रक्रिया उद्योग आणि निर्यातीलातील संधी ‘या विषयावरती संशोधन सादर केले. कृषी क्षेत्रावर असणाऱ्या या संशोधनाबद्दल श्रीलंका सरकारचे युवा सेवा महासंचालक पसिंदू गुनेरातने व रशिया च्या आंतरराष्ट्रीय व्यवहार प्रमुख, एकटेरिना झुकोव्स्काया यांनी त्याचे विशेष कौतुक केले व भविष्यात सहयोगाचे आश्वासन दिले. भविष्यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग व निर्यात यांवर संशोधन या प्रवासात त्याला त्याचे मार्गदर्शक डॉ प्रल्हाद माने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे त्याचे मामा बाळासाहेब गळवे व संजय गळवे यांचेही मार्गदर्शन लाभले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक