सांगोला (प्रतिनिधी):संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या निर्भिड बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्ध असणाऱ्या सीबीएस न्युज मराठी चा अजून एक हिरा चमकला आहे ते असे कि आपली चळवळ वृत्तपत्र समूह व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त यांच्या विद्यमाने दिला जाणार महा गौरव हा पुरस्कार सीबीएस न्युज मराठी चे सहसंपादक शशिकांत कोळी यांना बहाल करण्यात आला आहे.
विशेषतः गेल्या सहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल व सामाजिक बांधिलकी जपत आपल्या लेखणीतून विविध प्रश्नांना वाचा फोडत शशिकांत कोळी यांनी पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे .विशेषतःआपली चळवळ वृत्तपत्र समूह व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त महा गौरव पुरस्कार हा भव्य दिव्य वितरण सोहळा स्वेरी कॉलेज गोपाळपूर येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज व विचारवंतांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्यात आला आहे. या शानदार कार्यक्रमाचे आयोजन आपली चळवळ असे संपादक गोरक्ष गायकवाड यांनी केले होते.
सीबीएस न्यूज मराठी च्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून दमदार वाटचाल करीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीचा संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला सीबीएस न्यूज मराठीचा बोला बिनधास्त ह्या स्पेशल रिपोर्ट मध्ये शशिकांत कोळी यांचे मोलाचे योगदान आहे. आज खऱ्या अर्थाने सीबीएस मूव्हर्स मराठीचा पत्रकार चमकताना दिसतोय त्यांची निर्भीड जिद्द आणि चिकाटी पाहता आपली चळवळ वृत्तसमूह यांचा पुरस्कार मिळाला असावा. एवढाच नव्हे तर शशिकांत कोळी यांनी सीबीएस न्यूज मराठीचे सर्वेसर्वा मुख्य संपादक चांद भैया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या निर्भीड लेखणीतून वटणीवर आणले. शशिकांत कोळी यांनी घेतलेल्या सर्वसामान्य जनतेच्या मनाचा ठाव घेणारे मुलाखती खूपच गाजले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक