श्री. धनाजी बाबुराव मस्कर व सौ. मोक्षदा धनाजी मस्कर यांची कन्या चि. धैर्या हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी ५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
धनाजी मस्कर हे एच.डी.एफ.सी. बँक कोल्हापूर येथे कार्यरत असून मोक्षदा यादव- मस्कर या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदावर धायटी ता. सांगोला येथे कार्यरत आहेत. त्यांची कन्या चि. धैर्याच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी आपलीही थोडीसी मदत व्हावी म्हणून मस्कर कुटुंबीयांनी ५ हजार रुपयांची देणगी मंगळवारी देऊ केली.
यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, सुरेशकाका चौगुले, प्रा. राजेंद्र ठोंबरे, अण्णासाहेब मदने, नारायण विसापुरे, सचिन मिसाळ, संदीप पाटणे, रमेश गोडसे, सोमनाथ सपाटे, भीमाशंकर पैलवान, बाळासाहेब वाघमारे, प्रसन्न कदम, अरविंद डोंबे, सुभाष पाटोळे, सुनिल मारडे, छाया यादव, प्रथमेश यादव, बाबुराव मस्कर, राहुल शिंदे, सागर ननावरे आदी उपस्थित होते.
मस्कर कुटुंबियांनी दिलेल्या या देणगीबद्दल मस्कर परिवाराचे आपुलकीच्या वतीने आभार मानण्यात आले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक