दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी वारणा मल्टीपर्पज हॉल सांगली येथे संपन्न झालेल्या राजे छत्रपती चषक कराटे स्पर्धेमध्ये सांगोला येथील वाघमारे कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी कुमीते गटामध्ये 10 व कता त्यामध्ये एक असे एकूण 11 पदकांची कमाई करून यश संपादन केले.
कुमीते गटात आशिष कोकरे याने सुवर्णपदक व आरोही सावंत, योगिनी रणदिवे, संजोगगी रणदिवे, विरेन इंगोले, शिवतेज इंगोले,प्रताप करे, रुद्र करे, लोकेश गेजगे, रोहित अरबळी यांनी कांस्यपदक मिळविले.कता गटामध्ये आशिष कोकरे याने सुवर्णपदक मिळविले असे एकूण 11 पदके मिळून यश संपादन केले.सर्व विद्यार्थ्यांना श्री सुनील वाघमारे सर,निजेंद्र चौधरी, श्रावणी वाघमारे मॅडम, मयंक स्वामी आदींचे मार्गदर्शन लाभले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक