ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांची केंद्रीय नोटरी पदी निवड!

0

सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला येथील रहिवाशी व पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम पाहणारे ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय नोटरी पदी निवड करण्यात आली आहे.

ॲडव्होकेट  सारंग वांगीकर हे २००१ पासून सांगोला न्यायालयात वकिली व्यवसाय करत आहेत. त्यांनी वकिलीचे शिक्षण दयानंद विधी कॉलेज मध्ये पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी सोलापूर येथील प्रसिद्ध दिवाणी वकील बसवराज सलगर यांच्याकडे २ वर्षे प्रॅक्टिस केली. त्यानंतर सांगोला येथे दिवाणी फौजदारी न्यायालयात २००१ ते २०१३ पर्यंत वकिली व्यवसाय केला. २०१३ पासून सरकारी वकील म्हणून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत आहेत.

अनेक मोठ्या केसमध्ये सरकार पक्षाचे कामकाज त्यांनी चालवले आहे. सरकारकडून कार्यरत असताना त्यांच्या युक्तीवादामुळे आत्तापर्यंत १०० च्या वर आरोपीना शिक्षा झाल्या आहेत.

.      भारत सरकारने नोटरी नेमणूक करता अधिसूचना काढली होती. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मुलाखत घेण्यात आली होती. त्यात त्यांची निवड झाली व त्याबाबतचे भारत सरकारचे प्रमाणपत्र शुक्रवारी प्राप्त झाले. केंद्रीय नोटरी पदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here