आलदर हॉस्पिटलच्या वतीने आलदरवाडी (उदनवाडी) येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील एमडी बालरोग तज्ञ डॉ. महावीर आलदर व आलदर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ मार्च २०२५ रोजी जि.प.प्राथ.शाळा आलदरवाडी (उदनवाडी) ता. सांगोला येथे दुपारी ९ ते ११ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून वयाच्या १८ वर्षापर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील व त्याचबरोबर रुग्णांना मोफत औषधे देखील दिली जातील.

सदर रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज असल्यास आलदर हॉस्पिटल, एरंडे कॉम्प्लेक्स सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील. तरी सांगोला पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. सर्व रुग्णांनी मंगळवार दि.२८ जानेवारी रोजी आपले सर्व जुने रिपोर्ट व फाईल्स् घेवुन जि.प.प्राथ.शाळा आलदरवाडी (उदनवाडी) येथे यावे व मोफत शिबिराचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी ९०२९०४४००९ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. महावीर आलदर यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here