कोळे ता.सांगोला गावचे सुपुत्र श्री. प्रसाद बाळू बोधगीरे यांची सरळ सेवा भरती मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग सांगली येथे औषध निर्माण अधिकारी या पदावर नुकतीच निवड झाली आहे.
प्रसाद यांनी मेहनत व चिकाटीच्या जोरावर प्रयत्न करून यश संपादन केले. राजारामबापू पाटील शिक्षण संस्था फार्मसी कॉलेज कासेगाव (वाळवा) येथे त्यांनी एम फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील बाळू पांडुरंग बोधगिरे हे पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लिमिटेड भवानीनगर ( इंदापूर) येथे साखर कामगार असून आई सौ.पार्वती बाळू बोधगिरे या गृहिणी आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल श्री श्री श्री 108 रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसादवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक