घेरडी (प्रतिनिधी): घेरडी. ता.सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा घेरडीचे केंद्रप्रमुख तसेच शिक्षक समितीचे नेते अमोगसिद्ध कोळी गुरुजी यांची मुलगी व तसेच पत्रकार शशिकांत कोळी यांची पुतणी अस्मिता अमोगसिद्ध कोळी.हिने मार्च 2025 मध्ये झालेल्या एस. एस सी परीक्षेमध्ये 81.81% गुण मिळवून यश संपादन केले.
तिच्या यशामध्ये सांगोला विद्यामंदिर सांगोला प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच तिचे आजोबा जवाहर विद्यालय घेरडीचे शिक्षक मनोज कुमार माने सर व पालक यांचे ही मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल घेरडी परिसरात तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक