दक्षता हॉस्पीटलने सेवाभावी वृत्ती जपली – ना. प्रकाश आबिटकर

0

आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची दक्षता हॉस्पीटलला सदिच्छा भेट

सांगोला (प्रतिनिधी):- दक्षता हॉस्पीटलचे सर्व डॉक्टर्स सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. हॉस्पीटलबद्दल समाजात विश्वासार्हता असून हॉस्पीटलने सेवाभावी वृत्ती जपली आहे. त्यामुळे हॉस्पिटलचा अभिमान असून दक्षता हॉस्पीटलसारख्या हॉस्पिटलची गरज समाजाला आहे. मोठमोठ्या शहरात कॅथलॅबची सुविधा असते. तीच सुविधा सांगोल्यात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे. मोठ्या मोठ्या कथलब असतात. तीच सोय सांगोल्यात झाली असून शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच आरोग्याची सुविधा चांगली करण्यासाठी सर्वांनी मिळून गतिमान काम करूया अशी अपेक्षा आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

सांगोला शहरातील रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या दक्षता हॉस्पीटलला राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी काल शुक्रवार दि.१३ जून रोजी सदिच्छा भेट दिली. ना. प्रकाश आबिटकर यांनी दक्षता हॉस्पीटलची पाहणी करुन रुग्णांची विचारपूस केली. त्याप्रमाणे महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कामकाजाची माहिती घेत हॉस्पीटलच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी मा. आमदार शहाजीबापू पाटील, मा.आ. दिपकआबा साळुंखे-पाटील, सोमेश यावलकर, प्रा. संजय देशमुख, डॉ. अविनाश खांडेकर, अभिजीत नलवडे यांच्यासह हॉस्पीटलचे डॉक्टर्स, स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.आ. शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोलासारख्या दुष्काळी तालुक्यात गेल्या १५ वर्षात भरधाव वेगाने मोठा क्रांतीकारी बदल झाला आहे. सांगोल्यात आता सुसज्ज हॉस्पिटल उभे राहत आहेत. दक्षता हॉस्पिटलने रुग्णांना चांगली सेवा दिली असून राज्याला आपल्या घरातील आरोग्य मंत्री लाभले असून तालुक्याला आरोग्याच्या सर्व सुविधा मिळण्यासाठी वाटचाल सुरु असून ट्रामा केअर एक महिन्यात सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करत दक्षता हॉस्पीटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, पूर्वी सांगोला तालुक्यात अपेक्षित वैद्यकीय सेवा नव्हत्या, नवीन पिढीने सांगोला तालुक्यात मेडिकल क्रांती केली. गोरगरीबांची जाणीव असणारे अनेक डॉक्टर तालुक्यात तयार झाले.. कोरोना मध्ये तालुक्यात दक्षता हॉस्पिटल मोठी कामगिरी केली असून हॉस्पीटलमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले असून निःस्वार्थी सेवा हे आमचे तालुक्याचे वैशिष्ठे असल्याचे आवजुर्न सांगत दक्षता हॉस्पीटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हृदय रोग तज्ञ डॉ. सुनील पवार, दत्तात्रय उगले सर, अविनाश खांडेकर, डॉ. निरंजन केदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. शिवराज भोसले, अभिजीत सोनलकर डॉ. प्रवीण पैलवान, डॉ. धनाजी जगताप, डॉ. संतोष शिंदे, डॉ. अनिरुध्द पतकी, डॉ. विकास कवडे,डॉ. एम. बाय. पाटील, डॉ. अण्णा लवटे, डॉ. निरंजन केदार, डॉ. सुशांत बनसोडे, डॉ. सुनील पवार, डॉ.डी. बी. इंगवले यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. संतोष शिंदे यांनी केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here