धन्वंतरी जयंती निमित्त आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे हस्ते सांगोल्यातील सर्व धन्वंतरींचा सत्कार व कृतज्ञता सोहळा संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी): रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून सामाजिक सदभावनेतून रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या सांगोल्यातील सर्व धन्वंतरींचा डॉक्टर मंडळींचा सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी व रोटरी क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.सदरचा कार्यक्रम हा आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी धन्वंतरी जयंती व धनत्रयोदशी दिवशी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील सर्व डॉक्टर्स मंडळी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व आमदार पत्नी डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख हे अनुक्रमे हृदयरोग तज्ञ व स्त्रीरोग तज्ञ असून दोघेही स्वतः एक धन्वंतरीच आहेत याचेच औचित्य साधून श्री.अरुण पाटील व डॉ.निरंजन केदार यांच्या संकल्पनेतून वैद्यक शास्त्राची आद्य देवता भगवान धन्वंतरी यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास स्वयंस्फूर्तीने सांगोला तालुक्यातील एकूण 50 पेक्षा जास्त डॉक्टर मंडळी आणि रोटरी क्लब ऑफ सांगोला यांचे सर्व सदस्य ही उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात वैद्यकशास्त्राची व आरोग्याची देवता श्री भगवान धन्वंतरी यांचे पूजन करून व धन्वंतरी स्तवन म्हणून करण्यात आली. सांगोल्याचे ज्येष्ठ धन्वंतरी कै.डॉ.श्रीकांत भोसेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना सर्व धन्वंतरींच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ सांगोला व लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांच्या वतीने सर्व धन्वंतरींचा यथोचित सत्कार शाल,गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगोल्यातील सर्व डॉक्टर्स यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व येणाऱ्या सध्याच्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून सर्व डॉक्टरांना आवाहन केले की येणाऱ्या वर्षात गोरगरीब गरजू रुग्णांना व सर्व नागरिकांना शासकीय योजनेच्या अंतर्गत मोफत किंवा अतिशय अत्यल्प दरात आरोग्य सेवा द्यावी आणि सामाजिक सदभावनेतून जेवढ्या पद्धतीने लोकांना मदत करता येईल त्या पद्धतीने करावी. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय बंडगर यांनी केले आणि या कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख ,ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.प्रभाकर माळी ,ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.अमरसिंह शेंडे व रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री माणिक भोसले सचिव व रोटरी क्लबचे सदस्य श्री अनिल इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निरंजन केदार यांनी केले.

या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सांगोला चे अध्यक्ष सचिव व सर्व सदस्य उपस्थित होते तसेच सांगोल्यातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. मच्छिंद्र सोनलकर ,ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.अनिल कांबळे, डॉ.शिवराज भोसले ,डॉ.रणजीत केळकर ,डॉ.महेश राऊत ,डॉ.संतोष पिसे ,डॉ. एच व्ही गावडे डॉ.दत्तात्रेय इंगोले, डॉ.ढाळे डॉ. प्रशांत देशमुख ,डॉ.राजाराम लवटे ,डॉ. बसवेश्वर पाटील, डॉ. कोमल कांबळे ,डॉ. विनायक डमकले ,डॉ. उषा देशमुख, डॉ. अभयसिंह देशमुख, डॉ.फिरोज तांबोळी ,डॉ. अभिजीत सोनलकर ,डॉ.शैलेश डोंबे , डॉ. प्रमोद बोराडे, डॉ.सचिन गवळी, डॉ. विजय इंगवले, डॉ. प्रवीण पैलवान ,डॉ.अजित नवले ,श्री महादेव कोळेकर, डॉ.विवेकानंद विभुते ,डॉ. सारिका लवटे ,डॉ. सुनील लवटे ,डॉ.प्रज्ञा लवटे ,डॉ. अमर जाधव, डॉ.किरण जगताप ,डॉ. सैफुल तांबोळी ,डॉ. विनोद केदार, डॉ.सुपर्णा केळकर डॉ.मुल्ला ,डॉ. शिंगण ,डॉ.धनंजय गावडे ,डॉ. महावीर आलदर, डॉ.पटेल कोळा हे सर्व उपस्थित होते.

तसेच लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी चे सर्व सदस्य उपस्थित होते .सांगोल्यातील सर्व धन्वंतरींचा सत्कार व कृतज्ञतेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी पार पडला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here