महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडून दरवर्षी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महूदचे श्री अशोक कांबळे यांना मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई मध्ये देण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे समारंभपूर्वक देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजीक न्यायमंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदि मान्यवर उपस्थित होते
मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे. केंद्र शासनाच्या धोरणामुळे लाखो तरुण उद्योजक घडत असल्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
श्री. अशोक कांबळे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक