सांगोला (प्रतिनिधी) :मुलांनो लाख मोलाची माणसं भेटली पण तुमच्याहून अधिक नाही. जशी तिळाला भेटते गुळाची साथ तशी तुम्हा मुलांना लाभेल आम्हा शिक्षकांची साथ करावे तुम्हाला सतत आणि निरंतर मार्गदर्शन तुमच्या सर्वांगीण विकासाची ही आमची आस. म्हणून आज यानिमित्ताने तुमच्या स्वागताचा दिवस आहे खास. या काव्यपंक्तीप्रमाणे नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशालेमध्ये जल्लोषात करण्यात आले. मुलांना वाजत गाजत आणून औक्षण करून गोड पदार्थाची मेजवानी व वह्या पुस्तक व गुलाब पुष्प देऊन कार्यक्रम संपन्न झाला संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कोळसे पाटील व सोनंद येथे ग्राम सचिवालयाचे ग्रामविकास अधिकारी श्री के डी कदम यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.
श्री ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी आमच्या शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा आहे असंख्य विद्यार्थी आमच्या शाळेतून प्रत्येक क्षेत्रामध्ये घडले आहेत. पूर्ण गुणवत्ता राखण्याचा संस्थेकडून प्रयत्न केला जाईल. सर्वस्वी मदत केली जाईल असे मत व्यक्त केले व इयत्ता पाचवीतील व सर्व इयत्तेतील नवागत मुलांना उत्कृष्ट वह्या, पुस्तके, गुलाब पुष्प मिठाईसह वितरित केले. तर ग्रामविकास अधिकारी श्री के डी कदम यांनी मी नव्यानेच रुजू झालेलो आहे. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे खूप छान कार्यक्रम आयोजित करून त्यांचाही सत्कार केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शेडसाळे यांनी सन २०२४-२५ मधील सीईओ यानी जी दशसूत्री दिली होती त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास घडवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी शिक्षकांनी सर्वतोपरी उत्साहाने काम करावे सहकार्य करावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी पालक, सखी सावित्री एसएमसी सदस्य, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते चालू वर्षी प्रशालेमध्ये स्वच्छ थंड पिण्यासाठी पाणी, उत्कृष्ट पोषण आहार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, पालक सभा, कॉपीमुक्त परीक्षा विद्यार्थ्यांचा भावनिक विकास, समुपदेशन वाचन चळवळ पर्यावरण जागृती इत्यादी सर्व उपक्रमाची आखणी केलेली आहे त्यानुसार उपक्रम राबवले जातील अशी माहिती मुख्याध्यापिका यांनी दिली. उपस्थितांचे आभार संचालिका सौ. सरिता कोळसे पाटील मॅडम यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तबस्सुम इनामदार मॅडम यांनी केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक