जागतिक स्पर्धेच्या युगात आपला पाल्य जगाबरोबर किंबहुना त्यापुढे एक पाऊल पुढे राहावा, या हेतूने लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलाने विद्यार्थ्यांच्या सर्वच विषयाच्या प्रगतीसाठी ब्रेन बुस्टर अकॅडेमी, सांगली यांच्या सहकार्याने अबॅकस हा गणितीय संकल्पना दृढ करणाऱ्या उपक्रमाचे उदघाट्न नुकतेच संपन्न झाले.
अबॅकस या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शाळेतील शिक्षिका सौ. रत्नप्रभा साळुंखे व सौ. अर्चना बाबर यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण केले. अबॅकसमध्ये सात लेवल असून, या सर्व लेवल पूर्ण केलेला विद्यार्थी स्कॉलरशिप,मंथन तसेच इ. 12 वी नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितपणे यश मिळवितोच, कारण कोणतीही गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा कोणताही पाढा तयार करणे इ. गोष्टीत विद्यार्थी सक्षम होणार आहे. तसेच इतर सर्व विषयामध्येही विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढणार आहे.
सदर वर्गाचे उदघाट्न उपस्थित पालक प्रतिनिधी श्री. साळुंखे साहेब व विद्येची देवता सरस्वतीचे पूजन संस्था सदस्या सौ. रजनीताई भोसले यांचे हस्ते करण्यात आले.
वरील उदघाट्नप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. पुष्पा महाकाळ, प्राचार्य हेमंत आदलिंगे,पर्यवेक्षक प्रा. सुभाष आसबे, पर्यवेक्षिका सौ. सुषमा ढेबे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका,सेवक, सेविका यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक