नवलेनगर आयएसओ शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

0

एखतपुर (वार्ताहर):  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवले नगर या आयएसओ शाळेत 26 जून 2025 रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचा विद्यार्थी प्रतिनिधी सोहम फुले हा होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री बापूसाहेब ठोकळे व श्री गौतम शिंदे हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली दुसरीचे वर्गशिक्षक श्री आबासाहेब शेजाळ गुरुजी यांनी श्री बापूसाहेब ठोकळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी शैक्षणिक साहित्य आणले होते. एक वही, एक पेन्सिल,एक 19 खडी पुस्तक असे शैक्षणिक साहित्याचे स्वरूप होते. मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या वर्गातील विद्यार्थ्यांना ते साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवले नगर या शाळेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बापूसाहेब ठोकळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पहिली दुसरीची वर्गशिक्षक श्री आबासाहेब शेजाळ गुरुजी यांनी केले. आपल्या मनोगतच श्री बापूसाहेब ठोकळे म्हणाले की नवले नगर ही खरोखर आयएसओ दर्जाची शाळा आहे या शाळेला भेट देऊन मला भरपूर समाधान भेटले या शाळेचे व शिक्षकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. स्पर्धा परीक्षेत तसेच क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे श्री बापूसाहेब ठोकळे यांनी आपल्या मनोगतात अभिनंदन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री मोहन अवताडे यांनी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातच अंगणवाडीतील कीर्ती नावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शाळेतील 20 ते 25 विद्यार्थ्यांनी भाषणे केली.या आनंददायी कार्यक्रमाचे आभार विज्ञान पदवीधर श्री राजेंद्र बावणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ बालटे मॅडम व सौ जाधव मॅडम, विद्यार्थिनी प्रतिनिधी धनश्री नवले यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना पार्ले बिस्कीट वाटप करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here