सांगोला (प्रतिनिधी): शोतोकान स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यामार्फत दि. २७ जुलै २०२५ रोजी विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला येथे घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी दहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

यामध्ये श्वेताली सावंत, सोनल जवंजाळ, वैष्णवी गेजगे, आरोही सावंत, आरोही पवार, रीशांत बनसोडे, निवांश वाघमारे तर सीनियर ब्लॅक बेल्ट गटामध्ये शुभदा गव्हाणे, रोहित अरबळी, यश कोकरे यांनी यश संपादन केले.

या परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय प्रकाराचे नवीन अभ्यासक्रम व कता किक पंचेस ब्लॉक सेल्फ डिपेंड बुकाकी आधी विविध प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम घेण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्री सुनील वाघमारे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या परीक्षेला प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्मिता गव्हाणे, विधीतज्ञ साहिल सय्यद व नेहा जवंजाळ उपस्थित होते. या परीक्षा यशस्वी करण्याकरता निजेंद्र चौधरी व श्रावणी वाघमारे मॅडम यांनी अधिक परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


