सांगोला (प्रतिनिधी): उद्योग क्षेत्रात सातत्याने नाविन्य, प्रामाणिक सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा ठसा उमठवणाऱ्या माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा गौरव दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात देण्यात आला.

कार्यक्रमाची अध्यक्षता मा. ना. श्री जयकुमार गोरे साहेब (ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा) यांनी केली. यावेळी मा. ना. नरहरी झिरवळ साहेब (अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. आ. समाधान अवताडे साहेब (तालिका सभापती, महाराष्ट्र विधान सभा) हे मान्यवरही उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात गौरवाचा आणि प्रेरणेचा उत्साह पसरलेला दिसून आला.

श्री. इंगोले यांच्या नेतृत्वात माणगंगा परिवारने अल्पावधीत अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आज संस्था केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र नसून, ती एक विश्वासाचा आणि आर्थिक सक्षमीकरणाचा आधारस्तंभ ठरली आहे.
संस्थेच्या नावीन्यपूर्ण व सभासदाभिमुख योजनांमध्ये प्रमुख आहेत:
▪️कन्यारत्न ठेव योजना – मुलींच्या उज्ज्वल भविष्याची हमी
▪️ लखपती ठेव योजना – अल्प बचतीतून मोठी संपत्ती निर्माण करणारी संकल्पना
▪️माणगंगा आवर्तक ठेव योजना – नियमित गुंतवणूक, हमीदार परतावा
▪️ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना – उतारवयात आर्थिक स्थैर्याचा आधार
▪️आकर्षक व्याजदरासह विविध मुदत ठेव योजना
▪️जलद व सुलभ कर्ज सुविधा
▪️२४x७ RTGS, NEFT, IMPS व डिजिटल बँकिंग सेवा – आधुनिक तंत्रज्ञानाची सोबत

संस्था सध्या ग्रामीण व शहरी भागांतील हजारो सभासदांच्या जीवनात आर्थिक शिस्त, सुरक्षितता आणि भविष्यासाठीची योजना घडवत आहे. या यशामागे आहे श्री. इंगोले यांची दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि माणसांशी जोडलेली नाळ.
या सन्मानाने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण माणगंगा परिवाराच्या मूल्यांचा आणि कार्यपद्धतीचा सन्मान झाला आहे. पुरस्कार स्वीकारताना श्री. इंगोले यांनी हा गौरव सभासद, कर्मचारी व हितचिंतकांना अर्पण करत संस्थेच्या सामाजिक व आर्थिक बांधिलकीचे नवे संकल्प घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


