प्रकाश गळवे यांना राज्यस्तरीय “सह्याद्रीरत्न २०२५” पुरस्कार जाहीर

0

सांगोला (प्रतिनिधी ): टॅलेंटकट्टा संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “सह्याद्रीरत्न पुरस्कार २०२५” यावर्षी मा. श्री. प्रकाश दशरथ गळ्वे यांना जाहिर करण्यात आला आहे. ते हलदहिवडी विद्यालय व ज्यु. कॉलेज, हलदहिवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

गणित, विज्ञान आणि स्पर्धा परीक्षा या विषयातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळवून दिलेल्या विविध शिष्यवृत्त्यांमुळे त्यांची ही निवड करण्यात आली आहे. सन २०१९ पासून स्कॉलरशिप परीक्षेमध्ये २५ विद्यार्थी पात्र ठरले असून प्रत्येकी ६०,००० रुपये मिळवून दिले आहेत. त्याचबरोबर ८वी शिष्यवृत्तीसाठी ७विद्यार्थी आणि इतर सारथी शिष्यवृत्तीसाठी १७विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८,४०० रुपये मिळवले आहेत.

त्यांचे शिक्षणशास्त्रातील योगदान, विद्यार्थ्यांशी असलेला मनमिळावूपणा आणि प्रभावी मार्गदर्शन प्रयोगिक शिक्षण यामुळे हलदहिवडी व शिरभावी परिसरात ते अत्यंत लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. हा सह्याद्रीरत्न पुरस्कार त्यांना येत्या १० ऑगस्ट २०२५ रोजी पुणे पत्रकार भवन येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here