संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोर्चास सांगोला तालुक्यातील मराठा बांधव सांगोला ते आझाद मैदान मुंबई येथे मोर्चास जात असताना या मोर्चामध्ये सांगोला तालुक्याचे सुपुत्र डॉ निरंजन केदार हे स्वतः सहभागी होऊन मोर्चास जाणाऱ्या मराठा बांधवांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे काम डॉ निरंजन केदार यांनी केले आहे.

या मोर्चा मधील मराठा बांधवांची विचारपूस करून त्यांना औषध गोळ्या देऊन त्यांची तब्येत ठीक करण्याचे काम डॉ निरंजन केदार यांनी केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
सांगोला सकल मराठा बांधवांनी या मोर्चास जाताना रुग्णवाहिका घेऊन गेल्यामुळे या मोर्चातील रुग्णांना रुग्णवाहिका फायद्याची ठरली आहे.

“सांगोला ते आझाद मैदान आसा आमचा 500 गाड्यांचा ताफा आहे. सोबत सुसज्ज अशी डॉक्टर्सची टीम आहे नर्सिंग स्टाफ, ब्रदर्स स्टाफ आहे सर्वजण आम्ही काल सकाळपासून सांगोल्यातून निघाल्यापासून ते आतापर्यंत सेवा देत आहोत. काल रात्री आम्ही आझाद मैदान येथेही जाऊन सेवा दिली व तसेच जे काही बांधव अपघात झालेला असेल अशांना सुरक्षित हॉस्पिटल ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी घेतली आहे आणि ती आम्ही पार पाडत आहे.”
– डॉ निरंजन केदार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


