घेरडी (प्रतिनिधी) :रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी प्राथमिक आश्रम शाळा घेरडी या शाळेत भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर प्रियंका कोकरे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील सर्व निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात आली सुट्टीचा दिवस असूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका कोकरे तसेच शेख मॅडम तडवी साहेब व इतर स्टाफ या आश्रम शाळेमध्ये उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

किरकोळ आजारी असलेल्या मुलांच्यावर औषध उपचार करण्यात आला गंभीर आजारी कोणीही आढळून आला नाही त्यानंतर सर्व मुलांना आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विलास पाटील सर यांनी भटके विमुक्त दिन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले पूर्वीपासून भटक्या विमुक्तांच्या हालअपेष्टा व त्यांचे आजचे जीवन याविषयी सविस्तर मनोगत व्यक्त करतानाच प्रशालेतील भटक्या विमुकतांच्या मुलांना चांगलं शिक्षण घेऊन आपल्या जीवनात यश मिळवा असं भावनिक आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी प्रशालेतील श्री युवराज बाबर सर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व शेवटी उपस्थित डॉक्टर व प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ यांचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


