सांगोला (प्रतिनिधी ): एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापक/प्राचार्य पुरस्कार हलदहिवडी विद्यालय ज्युनि.कालेजचे मुख्याध्यापक/ प्राचार्य रामचंद्र जानकर सर यांना जाहीर करण्यात आला.सदर पुरस्कार सोहळा 7 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणार आहे.एक कर्तव्यदक्षआणि प्रत्येक सामाजिक कार्यात एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून ख्याती आहे. त्यांनी आपल्या प्रशालेमध्ये आपल्या कार्याने एक मानाचे स्थान निर्माण केले आहे. एक मुख्याध्यापक/ प्राचार्य म्हणून त्यांनी आपल्या प्रशालेत विविध उपक्रम राबवले आणि त्याची अंमलबजावणी ही स्वतः काळजीने करून घेतात .

यामध्ये एन. एम. एम. एस. परीक्षा इयत्ता ८ वी ,५वी स्कॉलरशिप परीक्षा, दहावी, बारावी जादा तास,सराव टेस्ट एवढेच नाही तर क्रीडा, चित्रकला ड्रॉइंग , इंग्रजी ग्रामर हिंदी,गणित,भुगोल,विज्ञान बाह्य परीक्षा, इन्स्पायर अवार्ड, खेळ विभाग,क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. आपल्या कार्याने प्रत्येक क्षेत्रात हलदहिवडी व शिरभावी परिसरात विद्यालयाने एक अग्रगण्य स्थान निर्माण केले आहे. या सर्वाचे श्रेय प्रशालेचे प्राचार्य श्री रामचंद्र जानकर सर आणि त्यांचा प्रशालेचा सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ यांना दिले जाते.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अपर्णा येडगे मॅडम ,उपाध्यक्ष विश्वनाथ (नाना )चव्हाण , जेष्ठ संचालक विलास (बापू )येडगे हलदहिवडीचे सरपंच सौ. सुरेखा ॠषिश्वर फाळके व उपसरपंच मंदाकिनी प्रभाकर चव्हाण व ग्रामस्त तसेच शिरभावी चे सरपंच आबा बंडगर, बाळासाहेब बंडगर,बापू होवाळ, राजेंद्र होवाळ, ग्रामस्त यांचे मोलाचे सहकार्य प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ, हलदहिवडी व शिरभावी ग्रामस्थच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


