माढा (जि. सोलापूर) : रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे हिंदी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहात पार पडले.

१४ सप्टेंबर निमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या हिंदी दिवस कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र वडजे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, “हिंदी ही केवळ भाषा नसून भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ती रोजगारक्षम भाषा ठरत आहे.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर होते. विद्यार्थ्यांनी कविता, निबंध व भाषण सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
दरम्यान, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमांचेही उद्घाटन झाले. या वेळी डॉ. वडजे यांनी “सेवा, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी ही NSS ची खरी ओळख असून युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा” असे आवाहन केले. उद्घाटनानंतर स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, ग्रामसंवाद व जनजागृती कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

या कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी मार्गदर्शन केले. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अलका घोडके, प्रा. चतुर्भुज गीते, प्रा. अमोल मोरे, प्रा. सुनीता मगर तसेच NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, प्रा. संकल्प बारबोले यांनी परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


