विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी भविष्याचा विचार करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास रयत शिक्षण संस्थेमधून घडविला जातो त्यासाठी एआय सारखे उच्च दर्जाचे प्रकल्प संस्थेमध्ये राबवले जात असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा.डॉ.सदाशिव कदम यांनी सांगितले.

ते रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल,रिधोरेच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मवीर विचार सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर आण्णा व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य चंद्रकांत दादा गायकवाड होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विष्णू मिसाळ यांनी करत शाळेच्या सर्वांगीण विकासांसह,शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल व शाळेच्या यशाबद्दल लेखाजोखा मांडला. शाळेच्या प्रगतीबद्दल व शाळेच्या यशाबद्दल पाहुण्यांसह,पालक वर्गातून समाधान व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण वेळीच ओळखून त्या क्षेत्रात निपुण होत गुणसंपन्न होऊन उच्च व अत्याधुनिक शिक्षणाच्या संधीचा फायदा करुन घेत त्या क्षेत्रात आपले नाव कमवा असे प्रतिपादन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले रयत शिक्षण संसथेचे,कला आणि वाणिज्य विद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल हेळकर यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉक्टर दत्तात्रेय काळेल सर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी माजी सरपंच तानाजी (आबा) गायकवाड,मा.मुख्याध्यापक अर्जुन कांबळे,मोहन देवकते,भारत शिंदे मा.कृषि अधिकारी,बाबासाहेब गायकवाड,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुशिलकुमार गायकवाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड (मेजर), शिवाजी गायकवाड,दिपक शिंदे, लक्ष्मण गायकवाड,सोसायटीचे चेअरमन भारत गायकवाड,अमोल भोसले,प्रविण गायकवाड,अतुल गायकवाड,अमजद तांबोळी,संदीप शिंदे,अंकुश गोडगे,सचिन गायकवाड, सह पालक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जाधव यांनी तर आभार सोनाली बोराडे मॅडम यांनी मानले.

कर्मवीर क्लासमेट ग्रुप १९९९च्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अण्णांच्या प्रतिमेच्या मिरवणूकीनंतर विद्यार्थ्यांना जेवण व इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या व स्कॉलरशिप, एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रम हा संपूर्ण रयत शिक्षण संस्थेमध्ये एकमेव उपक्रम असल्याचे गौरवोद्गार काढत ग्रुपचे कौतुक केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

