कोल्हापुर – कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस धावते तीन ते साडेतीन तास उशीरा

0

प्रवांशात व भाविकांत नाराजीचा सुर

गाडी वेळेत व कलबुर्गीहुन रात्री सोडण्याची अशोक कामटे संघटनेची मागणी

सांगोला (प्रतिनिधी): कोल्हापूर मिरज कलबुर्गी मार्गावर नुकतीच सकाळच्या सत्रामध्ये धावणारी गाडी क्र. 01451/52 कोल्हापूर – मिरज – कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्यात आली.

सकाळच्या सत्रामध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर व तुळजापूर या धार्मिक स्थळांची दर्शन यात्रेकरिता भाविकांना सोयीची व उपयुक्त अशी गाडी सुरू झालेली आहे.

यामुळे येणाऱ्या दिवाळी निमित्त देवदर्शन यात्रा करणाऱ्या भाविकांची उत्तम सोय झालेली आहे.या गाडीचा स्पेशल दर्जा असल्याने दर ही वाढीव आहेत.तरीही प्रवासी व भाविकांची या गाडीला पसंदी आहे.

परंतु या गाडीचे वेळापत्रक पाहिले असता या गाडीसाठी लुज टाइमिंग भरपूर प्रमाणात देण्यात आलेला आहे. तरीही ही गाडी 24 सप्टेंबर पासून सुरू झालेले असून ही गाडी आज तागायत सुमारे तीन ते साडेतीन तास उशिराने धावते.प्रवासात ही गाडी मध्येच एखाद्या स्थानकावर तासनतास थांबवुन ठेवली जाते.

यामुळे प्रवाशांनी व भाविकांनी केलेले नियोजन विस्कळते व नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे तरी या गाडीचा लूज टाइमिंग कमी करून सकाळच्या सत्रातील कोल्हापूर– कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस वेळेवर पोहोचवण्यात यावी व परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून रात्री उशिरा नऊ वाजता सोडण्यात यावी अशी मागणी शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना यांच्यावतीने केली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here