सांगोला (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर द्वारा आयोजित क्रीडा सप्ताह सन 2025- 26 विविध क्रीडा स्पर्धा 12 ते 18 डिसेंबर 2025 आयोजित करण्यात आल्या होत्या.यामधील कराटे स्पर्धा दि.18 डिसेंबर 2025 रोजी 14 वर्षीय मुला- मुलींच्या स्पर्धा तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे घेण्यात आल्या.
यामध्ये सांगोल्यातील सर्व शाळेतील कराटेची मुले सहभागी झाले होते. यामध्ये सिंहगड पब्लिक स्कूल, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल, सह्याद्री प्राथमिक विद्यालय, उत्कर्ष प्रशाला अनेक शाळेची मुले सहभागी झाले होते. विविध वजनीगटा प्रमाणे या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक
मुले – वजनी गट 20 ते 25 किलो
श्रीहरी देशपांडे (विद्यामंदिर प्रशाला)
25 ते 30 किलो वजनी गट
लोकेश गेजगे (न्यू इंग्लिश स्कूल), असद खतीब (सह्याद्री प्राथमिक विद्यालय), दिव्यांक खोत (सिंहगड पब्लिक स्कूल)
30 ते 35 किलो वजनी गट
गुरुराज पांढरे (सह्याद्री प्राथमिक विद्यालय), प्रयाग पवार (सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल), मोसिन पठाण (सह्याद्री प्राथमिक विद्यालय)
35 ते 40 किलो वजनी गट
अथर्व बंडगर (न्यू इंग्लिश स्कूल), सार्थक गडदे (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम), दिग्विजय जावीर (विद्यामंदिर प्रशाला)
40 ते 45 किलो वजनी गट
हर्षवर्धन हाके (विद्यामंदिर प्रशाला), विघ्नेश ठोंबरे (न्यू इंग्लिश स्कूल), प्रत्युष सावंत (उत्कर्ष प्रशाला)
45 ते 50 किलो वजनी गट
शिवराज कळसुले (विद्यामंदिर प्रशाला), पार्थ खरात (सिंहगड पब्लिक स्कूल), समर्थ बंडगर (न्यू इंग्लिश स्कूल)
50 ते 55 किलो वजनी गट
रेहान इनामदार
60 किलो वरील वजनी गट
अभयसिंह ऐवळे (सिंहगड पब्लिक स्कूल), शिवतेज इंगोले (विद्यामंदिर प्रशाला)

वजन गट मुली
26 ते 30 किलो वजनी गट
परिणीती माने (विद्यामंदिर प्रशाला)
30 ते 34 किलो वजनी गट
परिणीती नलवडे (उत्कर्ष प्रशाला)
34 ते 38 किलो वजनी गट
सिमरन शिनगारे (विद्यामंदिर प्रशाला), श्वेता मोरे (सह्याद्री इंग्लिश मीडियम)
38 ते 42 किलो वजनी गट
श्वेताली सावंत (उत्कर्ष प्रशाला), सना तांबोळी (विद्यामंदिर प्रशाला), शरयू भुसे (सह्याद्री इंग्लिश मीडियम)
42 ते 46 किलो वजनी गट
संजोगी रणदिवे (सह्याद्री प्राथमिक), तेजस्विनी खोत (सिंहगड पब्लिक स्कूल)
46 ते 50 किलो वजनी गट
राजलक्ष्मी वाघ
50 किलो वरील वजनी गट
आरोही सावंत (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम), ईश्वरी चव्हाण (सह्याद्री इंग्लिश मीडियम), संस्कृती झिंगळे (सह्याद्री इंग्लिश मीडियम)

या स्पर्धा राष्ट्रीय अ श्रेणी मान्यताप्राप्त पंचांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे माजी विद्यार्थी एडवोकेट साहिल सय्यद उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी साहिल सय्यद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करीत असताना विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या व गेमच्या नादी न लागता कराटे खेळाकडे लक्ष केंद्रित करावे. कराटे खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यावी असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला कराटेचे जिल्हाध्यक्ष जी के. वाघमारे सर, सुनील वाघमारे सर, श्रावणी वाघमारे, निजेंद्र चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले.स्वप्नील, सुभाष निंबाळकर, अमोल इमडे, धीरज पांढरे आदी उपस्थित होते.स्पर्धा प्रक्रिया अधिकारी सत्तेन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



